मराठी पत्र लेखन

您所在的位置:网站首页 formalletter मराठी पत्र लेखन

मराठी पत्र लेखन

2024-07-14 09:06:50| 来源: 网络整理| 查看: 265

मराठी पत्र लेखन | Marathi Letter Writing Format, Example & PDF | Informal & Formal Letter in Marathi 

या आर्टिकल मध्ये तुमच्या साठी सादर करीत आहो मराठी पत्र लेखन (Marathi Letter Writing) आणि पत्र लेखांचे नमुने. 

Marathi Letter Writing

या आर्टिकल मध्ये तुम्हाला संपूर्ण मराठी पत्र लेखन शिकायला मिडेल ज्या मध्ये अनोपचारिक पत्र लेखन (Informal Letter Writing in Marathi) आणि ओपचारिक पत्र लेखन (Formal Letter Writing in Marathi) दोघांचे नमुने पण तुम्हाला बघायला मिडेल.

Contents अनौपचारिक पत्रे औपचारिक पत्रे मागणीपत्र विनंतिपत्र तक्रारपत्र Marathi Letter Writing PDF

पत्रलेखनाचे प्रकार

अनौपचारिक पत्रे | Informal Letters In Marathi

आई, वडील, भाऊ, बहीण वा इतर कोणी आप्त आणि मित्र यांना उद्देशून लिहिलेली पत्रे, ही अनौपचारिक पत्रे होत. हल्ली मोबाईल व इंटरनेट यांमुळे अनौपचारिक पत्र लिहिण्याची गरज जवळजवळ संपुष्टात आली आहे. त्यामुळे वैयक्तिक स्तरावरील पत्रव्यवहार हल्ली आढळत नाही.

अनौपचारिक पत्राचा नमुना | Informal Letter in Marathi

1. तुमच्या मित्राला निबंध स्पर्धा मध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं त्यासाठी अभिनंदन करणारे पत्र.

२३२, गांधी नगर,मुंबई

प्रिय मित्र रमेश

सप्रेम नमस्कार,

अभिनंदन ! आज सकाळी वर्तमान पत्रात आलेली तुझी बातमी की, तू जिल्हास्तरीय निबंध स्पर्धेत सहभागी होऊन प्रथम क्रमांक पटकावला आहेस, हे वाचून मला खूप आनंद झाला. लागलीच तुला हे पत्र लिहीत आहे. शाळेत असतानाच तुझ्या विचारांनी मन भारावून जायचं. ज्या पद्धतीने तू एखाद्या विषयाला अनुसरून अगदी सोप्या आणि साध्या शब्दात लेख लिहायचा स सर्वांना च तुझा हेवा वाटायचा

आज तुला प्रथम क्रामांकाच पारितोषिक मिळालं हे पाहून माझं आनंद गगनात मावेना सारखं झालंय. तुझ्याकडे असलेली लेखनाची कला अशीच जप . तुझ्या पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा.

कळावे,तुझाच मित्र

Informal Letter in Marathi

औपचारिक पत्रे | Formal Letters In Marathi

औपचारिक वा व्यावसायिक पत्रांचे स्वरूप थोडे वेगळे असते. अशा पत्रांच्या प्रारंभी वरच्या उजव्या कोपऱ्यात पत्ता लिहिताना प्रथम आपले संपूर्ण नाव लिहावे. पत्रातील मजकूर विषयाला धरून, पण मुद्देसूद असावा. पाल्हाळ नंसावे. या पत्राची भाषा ओपचारिक असली, तरी वाचणार्‍्याला आपल्या पत्राचे महत्त्व वाटावे, अशी आकर्षक व भारदस्त असावी.

औपचारिक पत्राचा आराखडा | Formal Letter Format in Marathi

____________x_____________

[ पत्रलेखकाचे स्वतःचे नावपत्रलेखकाचा स्वतःचापत्ता व नंबर.]  

दिनांक: __________

प्रति,[ स्वीकार करणाऱ्याचे नाव,पदाचे नाव, संस्तेचा पत्ताइत्यादी तपशील येथे लिहावी.]

                विषय : [पत्राचा विषय कमीत कमी शब्दात स्पष्ट करा.]                   संदर्भ : [ पात्राला आधीच्या पत्रव्यवहाराचा संदर्भ असल्यास विषय च्या खाली संदर्भ लिहा.]

महोदय/महोदया,

                      [ येथे पात्राच्या मजकुराला सुरुवात होते. प्रत्येक मुद्द्यासाठी स्वतंत्र परिच्छेद करावा. या मजकुरात पाल्हाद, अलंकारिक्त,वैयक्तिक भावभावनांचे दर्शन नसावे.तक्रार सुद्धा सौम्य भाषेत असावी.]

[___________________________________________________________________________________________________________________________________________]

आपला/आपली,सही

सोबत:  

[ काही वेडा पत्रासोबत अन्य कागदपत्रे जोडाव्या लागतात. ] [ अशी कागतपत्रांची यादी या ठिकाणी लिहावी.]

प्रत माहितीसाठी :

[ काही पत्रे वेग्वेगड्या टप्यांवरील कार्यवाहीसाठी वेग्वेगड्या ठिकाणी पाठवल्या जातात. ] [ जी पत्रे वेग्वेगड्या ठिकाणी पाठवली जातात, त्या पात्रांमध्ये त्या व्यक्ती ची यादी या जागी लिहावी. ] ______________x__________ Formal Letters In Marathi

ओपचारिक पत्रांचे स्थूलमानाने काही उपप्रकार मानले जातात. ते पुढीलप्रमाणे आहेत :

मागणीपत्र बिनंतिपत्र तक्रारपत्र  1. मागणीपत्र | Magni Patra In Marathi

एखाद्या वस्तूची किंवा सेवेची मागणी करण्यासाठी लिहिलेले पत्र. मागणी पुरवणाऱ्याला योग्य तो मोबदला देण्याची आपली तयारी असते. पैशाच्या बदल्यात वस्तू-सेवा देण्याघेण्याचा रोकडा व्यवहार. त्यात भावनेचा अंश कमी असतो. सार्वजनिक जीवनात सोजन्याने वागण्याचे संकेत. म्हणून विनंतीची भाषा. मात्र, पत्राच्या केंद्रस्थानी मागणीच असते. (Magni Patra in Marathi)

मागणीपत्राच्या विषयाची कक्षा :

शालेय वस्तूंची मागणी करणे. (वह्या, पुस्तके, स्टेशनरी, तक्ते, नकाशे, उपकरणांचे सुटे भाग, प्रयोगशाळेतील वस्तू, विषय-प्रयोगशाळांसाठी वस्तू वगैरे.) घरासाठी आवश्यक वस्तूंची मागणी करणे. कॅटरर्सकडे अल्पोपाहाराची मागणी नोंदवणे. वाढदिवसासाठी भेटवस्तू मागवणे. शाळेसाठी नियतकालिकांची मागणी नोंदवणे. माहितीपत्रके (वस्तू, वास्तू, परिसर, परिवहन, सहल आयोजन, निवास व्यवस्था वगैरे) .

मांगणीपत्राचा नमुना

1. वनमहोत्सवात वृक्षरोपण करण्यासाठी रोपे मागवणारे पत्र.

रजनी जाधवविद्यार्थी प्रतिनिधी,शारदा विद्यालय,पुणे-४११ ११५.दि. २५ जुलै २०२१

प्रति,मा. वन-अधिकारी,वन विभाग,पुणे-४११००५.

विषय : वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी.

महोदय,

पुढील महिन्यात येणारा वनमहोत्सव आमच्याही शाळेत साजरा केला जाणार आहे. या महोत्सवासाठी शाळांना आपल्या खात्याकडून वृक्षांची रोपे विनामूल्य पुरवली जाणार आहेत, असे कळले. आमच्या शाळेलाही अशी रोपे हवी आहेत; त्यासाठी हे पत्र लिहीत आहे.

आमच्या शाळेला सुमारे दोनशे रोपे हवी आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या वृक्षांची रोपे आम्ही निवडू हेपत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे. तसदीबद्दल क्षमस्व.

आपली कृपाभिलाषीरजनी जाधवविद्यार्थी प्रतिनिधी

2. शाळेच्या कार्यालयाकरिता स्टेशनरी सामानाची मागणी करणारे पत्र.(शालेय वस्तू मागणी पत्र)

आदर्श विद्यालय जवाहर नगर, सांगली -४१६ ४१६. दि. ३०-७-२०२१

प्रति,मे. भरत स्टेशनरी मार्ट,जोगेश्वरी चौक,पुणे-४११ ००२.

विषय : स्टेशनरी सामानाची मागणी.

महोदय, 

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही आमच्या शाळेसाठी आवश्यक असलेल्या स्टेशनरी मालाची पुढील यादीनुसार मागणी या पत्रादवारे करीत आहे. कृपया सर्व साहित्य त्वरित पाठवावे, म्हणजे शाळेचे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी ते आमच्या हाती येईल व गैरसोय होणार नाही. 

मालाचे बिलही सोबत पाठवावे, म्हणजे रक्‍कम त्वरित पाठवून देता येईल.

कळावे, लोभ असावा.

स्टेशनरी मालाची यादी

SR ब्स्तू संख्या 1 आखीव कागद २ रीम 2 कोरे कागद १ रीम 3 शिसपेन्सिली ४ डझन 4 रंगीत पेन्सिली १ डझन 5 पिन्स १ डझन पाकिटे 6 शाईचे खोडरबर ४ डझन

आपला कृपाभिलाषी, य.र.ल. विद्यार्थी भांडारप्रमुख, आदर्श विद्यालय, सांगली .

Magni Patra In Marathi

आणखी मांगणीपत्र नमुना बघण्या साठी क्लिक करा.

2. विनंतिपत्र | Vinanti Patra In Marathi 

एखाद्या व्यक्तीकडून किंवा संस्थेकडून आर्थिक मदतीची विनंती करण्याकरिता लिहिलेले पत्र. एखाद्या तज्ज्ञ व्यक्‍तीच्या ज्ञानाचा, व्यासंगाचा, अनुभवाचा लाभ व्हावा म्हणून त्या व्यक्‍तीला लिहिलेले पत्र. मदत करणे हे त्या संबंधित व्यक्‍तीच्या पूर्णपणे इच्छेवर अवलंबून असते. म्हणून संबंधित व्यक्‍तीला विनंतीच करावी लागते. (vinanti patra in marathi) मुख्य विषयाबरोबर विनंतीची भावनाही केंद्रस्थानी आहे. म्हणून हे विनंतिपत्र होय. निमंत्रणे देणे, देणगी मागणे, स्थळभेटीसाठी परवानगी घेणे, अग्निशमनदलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे, 'शालेय समिती'मध्ये सहभागी होण्यासाठी नगरसेवक किंवा सरपंच यांना आमंत्रित करणे, विदयार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी पालकांना आवाहन करणे यांसारख्या प्रसंगांत विनंतिपत्रे लिहिली जातात.

विनंतिपत्राच्या विषयाची कक्षा :

विविध सभा-समारंभांसाठी आमंत्रण देणे. देणगी, भेटवस्तू मिळवणे. स्थळभेट, सहल इत्यादींसाठी परवानगी मिळवणे. शालेय उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण देणे. विद्यार्थ्यांचे आरोग्य, ताणतणाव, पोगंडावस्थेतील समस्या इत्यादींबाबतच्या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी  आवाहन करणे. आधुनिक जीवनशैलीचे दुष्परिणाम टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करायला तज्ज्ञ व्यक्‍तींना आमंत्रण देणे. अग्निशमन दलासारख्या संस्थांना मार्गदर्शनासाठी बोलावणे.

विनंती पत्राचा नमुना   1. दहावीच्या वर्गाने तिळगूळ समारंभ आयोजित केला आहे, त्यास उपस्थित राहण्याबद्दल वर्गप्रतिनिधी, गुरुजनांना विनंतिपत्र लिहीत आहे. अ. ब. क. वर्गप्रतिनिधी, १० वी अ, हुतात्मा चापेकर विद्यालय, गणेशखिंड, पुणे-४११ ००३. दि. १४ जानेवारी २०२१ प्रति, माननीय मुख्याध्यापक व अन्य शिक्षक, हुतात्मा चापेकर विद्यालय, पुणे-४११ ००३. विषय : तिळगूळ समारंभाला उपस्थित राहण्याची विनंती.  महोदय,  सादर नमस्कार. आम्ही दहावी 'अ'च्या सर्व विद्यार्थ्यांनी आज आमच्या वर्गात तिळगूळ समारंभ साजरा करण्याचे ठरवले आहे. यंदाचे वर्ष हे शाळेतील आमचे शेवटचे वर्ष आहे, म्हणून आम्ही हा समारंभ आयोजित केला आहे. या समारंभासाठी आपण आमच्या वर्गात कृपया ठीक चार वाजता उपस्थित राहावे आणि आम्हांला शुभेच्छा द्याव्यात, अशी आमची इच्छा आहे. माननीय मुख्याध्यापक श्री. कुळकर्णी सर अध्यक्षस्थान स्वीकारणार आहेत. तरी आपण आमचे निमंत्रण स्वीकारून आमचा तिळगूळ समारंभ गोड करून घेण्यास यावे. आम्ही आतुरतेने आपली वाट पाहत आहोत.  आपला नम्र विद्यार्थी, अ. ब. क. वर्गप्रतिनिधी १०वी अ 2. आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी निर्मलग्राम पंचक्रोशीतील डॉक्टरांच्या संघटनेने करावी, अशी त्या संघटनेला विनंती करणारे पत्र लिहा. अ. ब. क. विद्यार्थी प्रतिनिधी, विद्यादेवी प्रशाला, निर्मलग्राम, सांगली - ४१६ ३०१. दि. १९ ऑगस्ट २०२१ प्रति, डॉ. बाळ काऱ्हेरे सेक्रेटरी,  निर्मलग्राम आरोग्य वाहिनी, निर्मलग्राम, सांगली - ४१९६ ३०१. विषय : विद्यादेवी प्रशालेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी. महोदय,  मी विद्यादेबी प्रशालेची विद्यार्थी प्रतिनिधी असून आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्याची विनंती करण्यासाठी आपणास हे पत्र लिहीत आहे. आपणांस ठाऊकच आहे की, आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी हे शेतकर्‍यांची मुले आहेत. अलीकडे आमच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या तक्रारी खूपच वाढल्या आहेत. गरिबी, अज्ञान व आरोग्याविषयी अनास्था यांमुळे प्रकृतीची हेळसांडच होते. आपण आमच्या शाळेत आरोग्य तपासणीचे शिबिर घेतलेत आणि आरोग्याविषयी आम्हांला मार्गदर्शन केलेत, तर आम्हांला खूपच फायदा होईल. आमच्या शाळेतील सर्वच विद्यार्थी गरीब असल्यामुळे आपण ही तपासणी मोफत करावी, अशी विनंती आहे. कळावे. आपली नम्र विद्यार्थी, अ. ब. क. विद्यार्थी प्रतिनिधी Vinanti Patra In Marathi 3. तक्रारपत्र | Complaint Letter In Marathi 

कशाबद्दल तरी, कोणाविरुद्ध तरी तक्रार केलेली असते. तक्रारीची कारणे - फसवणूक, नुकसान, अन्याय, समाजविघातक गोष्टी, मानवी जीवनाला घातक बाबी इत्यादींबाबत संबंधित व्यक्‍ती, संस्था किंवा शासन यांच्याकडे तक्रार. (complaint letter in marathi) तक्रारपत्रात तक्रारनिवारणाची विनंती केलेली असते. तरीही हे विनंतिपत्र नव्हे. पत्राच्या गाभ्यामध्ये तक्रारच असते.

तक्रारपत्राच्या विषयाची कक्षा :

फसवणूक नुकसान  अन्याय हक्क हिरावून घेतला जाणे समाजधारणेला घातक बाबी | मानवी जीवनाला धोका निर्माण करणाऱ्या बाबी (उदा., वृक्षतोड) ति इत्यादी प्रकारांविरुद्ध तक्रार नोंदवणे.

तक्रार पत्राचा नमुना

1. शाळेच्या भोवताली फेरीवाल्यांकडून होणाऱ्या त्रासाबद्दल पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करीत असल्याचा तक्रार अर्ज तयार करा.

कुमारी आर्या म. आमरे विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यालय, कोथरूड, पुणे-४११ ०३९. दि. १० सप्टेंबर २०२१

प्रति,माननीय पोलीस अधीक्षक,कोथरूड पोलीस स्टेशन,कोथरूड, पुणे - ४११ ०३९.

विषय : शाळेभोवती होणारी फेरीवाल्यांची गर्दी हटवणे.

महोदय,

स.न. वि. वि.

मी-आर्या आमरे शारदा विद्यालयाची विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून आपणांस हे पत्र लिहीत आहे.

कोथरूडच्या शिवाजी चौकात आमची प्रशाला आहे. आमच्या या शाळेजवळ नेहमीच फेरीवाल्यांची गर्दी असते. विशेषत: सकाळी शाळा भरण्यापूर्वी, शाळा सुटण्याच्या वेळी आणि मधल्या सुट्टीत फेरीवाल्यांची गर्दी वाढते. त्यामुळे शाळेत प्रवेश करताना, बाहेर पडताना त्रास होतो. रस्ता ओलांडताना अपघात होण्याचा धोका वाढला आहे. इतरही वेळी ते विक्रीसाठी आरडाओरडा करतात. कधी कधी त्यांची आपापसात भांडणेही होतात. यांमुळे वर्गात अध्ययन-अध्यापनात खूप अडथळे येतात.

कृपया आपण यांत लक्ष घालून शाळेला होणारा त्रास दूर करावा, ही विनंती. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापकांच्या अनुमतीने लिहीत आहे.

तसदीबद्दल क्षमस्व.

आपली कृपाभिलाषी, आर्या आमरे, विद्यार्थी प्रतिनिधी, शारदा विद्यालय.

2. रस्त्यावरील कचरापेटीची दुर्दशा महानगरपालिकेच्या अधिकाऱयांना पत्र लिहून कळवत आहे. 

समीर वागळे, वि १३१, मातृसदन, पेरू गेट, सदाशिव पेठ, पुणे-४११ ०३०. दि. १० सप्टेंबर २०२१

प्रति,माननीय आरोग्याधिकारी,आरोग्य विभाग,पुणे महानगरपालिका,पुणे -४११९ ०१०.

विषय :  शहरातील अस्वच्छतेबाबत तक्रार.

महोदय,

स. न. वि. वि. 

मी पेरू गेट येथील मातृसदनमध्ये राहतो. आमच्या घरासमोर कचऱ्यासाठी एक पेटी ठेवलेली आहे. दुर्देव असे की, या विभागातील सर्व लोक सुशिक्षित असूनही कचरा टाकताना तो कचरापेटीत पडेल याबाबत काळजी घेत नाहीत. त्यामुळे बराचसा कचरा पेटीबाहेर पडलेला असतो. कागद गोळा करणारी मुले तो आणखीनच पसरवतात. रात्री-अपरात्री कुत्री तेथे गोळा होऊन भुंकत असतात.

दुसरी बाब अशी की, कचरा उचलणारी गाडी येथे दररोज येत नाही. त्यामुळे येथे भयंकर दुर्गंधी सुटलेली असते. अशा परिस्थितीत या परिसरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येईल, अशी चिंता वाटते.

आपण याबाबतीत लक्ष घालून चौकशी करावी आणि दररोज किंवा एक दिवसाआड कचरागाडी येथे येईल अशी व्यवस्था व्हावी, ही विनंती.

 तसदीबद्दल क्षमस्व.

आपला कृपाभिलाषी,

समीर वागळे

Complaint Letter In Marathi

Marathi Letter Writing PDF

मराठी पत्र लेखन pdf ला डाउनलोड करण्या साठी खाली दिलेल्या लिंक वर लीक करा.

Click Here To Download

तर हे होतं संपूर्ण मराठी पत्र लेखन (Letter Writing in Marathi) ची विस्तृत माहिती सोबत तुम्ही मराठी पत्र लेखन pdf पण डाउनलोड करून ठेऊ शकता. तुम्हाला हे आर्टिकल कसा वाटलं आम्हाला कंमेंट मध्ये सांगा आणि या आर्टिकल ला आपल्या मित्रां सोबत सहारे करा.

Read

मराठी अंक १ ते १०० | Number Names In Marathi 1 To 100 

Marathi Months Name | मराठी महिने व नाव मराठी आणि इंग्रजी

Days Of The Week In Marathi And English | आठवड्याचे वार इंग्रजीत 

Marathi Alphabets With PDF | मराठी मुळाक्षरे | Marathi Varnamala

मराठी समानार्थी शब्द | Samanarthi Shabd In Marathi 



【本文地址】

公司简介

联系我们

今日新闻


点击排行

实验室常用的仪器、试剂和
说到实验室常用到的东西,主要就分为仪器、试剂和耗
不用再找了,全球10大实验
01、赛默飞世尔科技(热电)Thermo Fisher Scientif
三代水柜的量产巅峰T-72坦
作者:寞寒最近,西边闹腾挺大,本来小寞以为忙完这
通风柜跟实验室通风系统有
说到通风柜跟实验室通风,不少人都纠结二者到底是不
集消毒杀菌、烘干收纳为一
厨房是家里细菌较多的地方,潮湿的环境、没有完全密
实验室设备之全钢实验台如
全钢实验台是实验室家具中较为重要的家具之一,很多

推荐新闻


图片新闻

实验室药品柜的特性有哪些
实验室药品柜是实验室家具的重要组成部分之一,主要
小学科学实验中有哪些教学
计算机 计算器 一般 打孔器 打气筒 仪器车 显微镜
实验室各种仪器原理动图讲
1.紫外分光光谱UV分析原理:吸收紫外光能量,引起分
高中化学常见仪器及实验装
1、可加热仪器:2、计量仪器:(1)仪器A的名称:量
微生物操作主要设备和器具
今天盘点一下微生物操作主要设备和器具,别嫌我啰嗦
浅谈通风柜使用基本常识
 众所周知,通风柜功能中最主要的就是排气功能。在

专题文章

    CopyRight 2018-2019 实验室设备网 版权所有 win10的实时保护怎么永久关闭